Swapnil Bandodkar New Song: गायक स्वप्नील बांदोडकरचं ‘सांग प्रिये’ रोमॅन्टिक सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला, सप्तसूर म्युझिकची निर्मिती
Swapnil Bandodkar

गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं (Swapnil Bandodkar) आता 'सांग प्रिये' (Sang Priye) या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज दिला आहे. कोमल खिलारे (Komal Khilare) आणि सोहम चांदवडकर (Soham Chandwadkar) ही नवी जोडी त्यात झळकली असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना या गाण्याचा आस्वाद घेता येईल. कोमल ही डाॅक्टर तर सोहम हा पायलट असून दोघेही प्रसिद्ध माॅडेल आहेत. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे, तर अमेय मुळे यांनी संगीत रचना, निखील श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे.

आजवर स्वप्नील बांदोडकरनं अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्नीलची खासियत आहे. त्यामुळे स्वप्नील तरुण-तरुणींचा लाडका गायक आहे. सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं स्वप्नीलनं अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे. (हे ही वाचा Lagan Marathi Movie: टीझरनं वाढवली 'लगन'ची उत्सुकता, लवकरत झळकणार रुपेरी पडद्यावर)

त्याशिवाय फ्रेश जोडी, उत्तम शब्द आणि संगीत, सुखद दृश्य यांचा मिलाफ या म्युझिक व्हिडिओमध्ये झाला आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीच्या आवाजातील या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांची दाद मिळेल यात शंका नाही.