डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे रमाबाईंच्या भूमिकेत
Shivani Rangole (Photo Credits: Instagram)

बुद्ध पौर्णिमेचा मुहूर्त साधत स्टार प्रवाह वाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) ही नवी मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. तर मालिकेत बाबासाईबांच्या पत्नीची रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ही भूमिका साकारणार आहे. या संदर्भातील खास पोस्ट शिवानी ने इंस्टावर केली आहे.

पोस्टमध्ये तिने लिहिले की, "तीव्र इच्छाशक्ती असलेलं ऐतिहासिक पात्र साकारणं हे माझं स्वप्न होतं. आणि माझे स्वप्न सत्यात अवतरले आहे. मी भीमराव या नव्या मालिकेत रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. या प्रवासाचा मी एक भाग आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. रमाबाई आंबेडकरांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे." (पहा मालिकेचं शिर्षकगीत)

शिवानी रांगोळे हिची पोस्ट:

 

या मालिकेचे शिर्षकगीत आदर्श आणि उत्कर्ष शिंदे यांच्या लेखणीतून अवतरले असून दोघांनी मिळून हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शचा दमदार आवाज गाण्याला लाभला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून महामानवाची गौरवगाथा छोट्या पडद्यावर उलघडणार आहे. कालपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.