कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना सलमान खानकडून मदतीचा हात; खिद्रापूर गाव दत्तक घेऊन जिंकले ग्रामस्थांचे मन
A still of Salman Khan from the sets of Bigg Boss. (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर, सातारा आणि सागंली जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संकाटाचा सामना करावा लागला होता. तसेच अनेक गाव पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणावरून पुरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली होती. यातच बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने पुरग्रस्तांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमान खानने कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील खिद्रापूर (Khidrapur) गाव दत्तक घेऊन पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. तसेच खिद्रापूर येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक केले जात आहे.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था सलमान खान फिल्मस् आणि गुरुग्राम येथील एलान फाऊंडेशन या 2 संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतले आहे. या संस्था येथील पुरात वाहून गेलेली घर पुन्हा बांधून देणार आहेत. राज्य सरकार आणि गुंतवणूकदारांच्या सहकार्याने ही कामे करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्यासोबत एलान फाऊंडेशनने करारही केला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 7 सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पुरामध्ये ज्यांनी आपले कुटुंब गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. काही गोष्टी आपल्याला परत आणता येत नाहीत. परंतु, या या पुरामध्ये अनेकांनी आपली घरे गमावली आहेत. त्यांना पुन्हा घरे बांधून द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सलमान म्हणाला आहे. हे देखील वाचा- Savita Bhabhi Song in Ashleel Udyog Mitra Mandal: अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हॉट आणि मादक अदांची झलक दाखवणारे अश्लील उद्योग मित्र मंडळ चित्रपटातील 'सविता भाभी' गाणे प्रदर्शित, Watch Video

एक जबाबदार संस्था म्हणून भारताच्या ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. सलमान खान यांनी या कामात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे एलान फाऊंडेशनचे संचालक रवीश कपूर म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे सलमान खान याने बिंग ह्यूमन्स या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. याशिवाय सलमान खाने अनेकदा शैक्षणिक, वैद्यकीय कामाकरीताही पैसे दान केले आहेत