5 कोटींच्या फसवणुकीविरोधात केलेल्या तक्रारीमुळे Remo D'souza अडचणीत; अजामीनपात्र वॉरंट केलं जारी
Remo D'Souza | (Picture Credit: Facebook)

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'Souza) सध्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका इसमाने रेमोच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

राज नगर येथे राहणाऱ्या सत्येंद्र त्यागी याने तक्रारीत असे म्हटले आहे की रेमो याने त्याच्याकडून 2016 साली एका आगामी चित्रपटाच्या नावावर 5 कोटी उचलले होते. 'अमर मस्ट डाय' (Amar Must Die) असे नाव असलेल्या या चित्रपटासाठी घेतलेल्या या रकमेच्या दुप्पट पैसे करून देतो असे आश्वासन रेमो यांनी केले होते. परंतु अद्याप त्यांनी काहीही रक्कम परत केले नसल्याचे त्यागु यांनी सांगितले.

या तक्रारीनंतर गाझियाबाद कोर्टाने रेमोच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. पोलीस उपाधीक्षक (Deputy Superintendent of Police) आतिष कुमार यांनी सांगितले की हे वॉरंट अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी (Additional Chief Judicial Magistrate) महेश रावत यांनी फर्मावले आहे आणि मेरठच्या पोलीस महानिरीक्षकांची (Inspector General of Police) परवानगी घेतल्यानंतर ते रेमोच्या मुंबईच्या घरी पाठवले जाईल. न्यायालयात गैरहजर राहिल्यानंतर हे वॉरंट रेमोच्या विरोधात काढण्यात आलं होतं. (हेही वाचा. Dabangg 3 Saiee Manjrekar First Look: दबंग 3 मधून डेब्यू करत आहे महेश मांजरेकर यांची मुलगी; सलमान खानने शेअर केला फर्स्ट लुक)

रेमो डिसूजा सध्या त्याच्या आगामी चित्रपट स्ट्रीट डान्सर 3D (Street Dancer 3D) च्या प्रदर्शनाच्या गडबडीत व्यग्र आहे. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत.