ram charan - file

हैद्राबाद: दाक्षिणात्य चित्रपटसुष्टीतला सुप्रसिध्द अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपसाना कोनिडीला यांच्या घरी पाळणा हलणार आहे. उपासनाने आज दिनांक २० जून रोजी चिमुकलीला जन्म दिल आहे. राम चरण आणि उपासनाने चाहत्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली.  आनंदाची ही बातमी दिल्यानंतर  चाहत्यांनी त्यादोघांना शुभेच्छा दिल्या. उपासनाला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राम आणि उपासना ह्या दोघांना ११ वर्षांनंतर पहिलं मुल झाले आहे.

सोमवारी उपासनाला हैद्राबाद येथील ज्युबिली हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या जन्माची बातमी रुग्णालयाने बुलिटीन मध्ये दिली. ह्या आनंददायी बातमीमुळे राम चरण यांचे कुटुंब मंगलमयी झाल्याचे दिसून येत आहे.

सुपरस्टार चिरंजीवी आजोबा झाल्याने त्यांच्या सुखाचा कळस उंचावला आहे. गेल्या वर्षांपासून चिरंजीवी ह्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत असल्याचे सांगितले जात आहे. राम चरण आणि उपासना यांचे लग्न १४ जून २०१२ रोजी झाले होते. लग्नानंतर ११ वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला आहे.  चिमुकलीच्या स्वागतासाठी सर्वांचीच उत्सुकता लागली आहे