#MeToo अंतर्गत तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये राखी सावंतने उडी घेऊन फार मोठी चूक केल्याचे दिसत आहे. राखी सावंतने केलेल्या वक्तव्यामुळे तनुश्री दत्ताने राखी सावंतवर 10 करोड रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर जळफळाट झालेल्या राखीने आपण तनुश्री दत्तावर 50 करोड रुपयांचा दावा ठोकत असल्याचे विधान केले होते. मात्र राखीच्या या पोकळ धमक्यांना घाबरेल ती तनुश्री कसली? म्हणूनच राखीने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली, या प्रत्रकार परिषदेमध्ये राखीने तनुश्रीवर अतिशय घाणेरडे आणि विश्वास न बसणारे आरोप केले आहेत.
आपण खूप सोज्वळ आहे हे पत्रकारांना दाखवण्यासाठी राखी सावंत आज साडी नेसून आणि डोक्यावर पदर घेऊन पत्रकार परिषदेला आली होती. या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने चक्क अनेक वेळा आपला बलात्कार केला, अश्लील पद्धतीने स्पर्श केला असे राखीने सावंतने म्हटले आहे. तनुश्री दत्ता मुलगी नसून मुलगा असल्याने तिने मुंडण केले होते असेही राखी पुढे म्हणाली.
तसेच तनुश्री दत्ता मला वेगवेगळ्या रेव्ह पार्टीमध्ये घेऊन गेली होती, तुथे तिने स्वतः अंमली पदार्थांचे सेवन केले आणि मलाही ते जबरदस्तीने घेण्यास भाग पाडले. तनुश्री दत्ता एक लेस्बिअन असून तिने माझ्यावरदेखील बलात्कार केला होता. बलात्काराचे दोन साक्षीदार असल्याचे राखीचे म्हणणे आहे. या साक्षीदारांची नावं जाहीर करायला तिने नकार दिला, मात्र आपण त्यांना कोर्टासमोर हजर करायला आपण तयार असल्याचे तिने सांगितले.
शेवटी “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करते की बेटी बचाओ मोहिमेप्रमाणेच आता आदमी बचाओ मोहीमही सुरू करा” असे राखी म्हणाली. अशीच परिस्थिती राहिली तर उद्या मोदींवरही आरोप होतील असेही राखीने पत्रकार परिषदेत म्हटले.