तनुश्रीनेच महिला रेसलरला पैसे देऊन धुतले, राखी सावंतचा दावा
राखी सावंत (Photo Credits: Facebook and Youtube)
सोमवारी राखी सावंत आणि विदेशा रेसलर यांच्यामध्ये झुंज झाली. मात्र आयटम गर्ल राखी सावंत मात्र तिला या गोष्टीत हरवू शकली नाही. त्यामुळे राखीला आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. परंतु तनुश्रीनेच त्या महिला रेसलरला पैसे देऊन मला धुतले असल्याचा दावा राखी सावंत करत आहे.
पंचकुला येथे चालू असलेल्या रेसलिंग रॅव्हलीमध्ये राखी सावंतने भाग घेतला होता. तर तिच्या विरुद्ध एक महिला रेसलर तिच्याशी झुंजणार होती. मात्र या विदेशी महिलेने आपले शक्ती प्रदर्शन करत राखीला खाली जोरात आपटले. त्यामुळे राखीच्या पाठीला दुखापत झाली असल्याने तिची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या राखीच्या व्हिडिओतून तिने तनुश्रीवर पुन्हा एकदा आरोप करत तिनेच रेसलरला पैसे देऊन धुतले असल्याचे सांगितले आहे.

या रेसलिंग रॅव्हलीमध्ये, मी तर नाचण्यासाठी गेली होती असे राखी सावंत सांगत आहे. परंतु त्या विदेशी रेसलरने तनुश्रीच्या सांगण्यावरुन मला धोपटले असल्याचा राग तिने व्यक्त केला आहे. तसेच आता राखी सावंत तनुश्रीला धोपटणार अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.