Made In China: Rajkumar Rao ने Leonardo Decaprio ला विकलं पेन; झाला भलताच प्रभावित
Rajkumar Rao | (Picture Credit: Instagram)

आपल्या आगामी 'मेड इन चायना' (Made in China) या चित्रपटात गुजराती उद्योजक रघु मेहताची भूमिका साकारत असणारा राजकुमार राव (Rajkumar Rao) लियोनार्डो डिकॅप्रिओला (Leonardo Decaprio) पेन विकत आहे. लियोनार्डो डिकॅप्रिओ सारखा हॉलीवूड स्टार हिंदी चित्रपटात काम करतोय आणि अजून कुठेही त्याची वाच्यता असा प्रश्न पडला असेल ना? साहजिक आहे. पण तो चित्रपटात काम करत नसून तसेच राजकुमार रावने सुद्धा न भेटताच त्याला पेन विकण्याचा घाट घातला आहे.

राजकुमारने आपल्या इंस्टाग्राम वर शेयर केलेला हा व्हिडिओ खरं तर एडिटेड व्हिडिओ आहे.  या व्हिडिओ लियोनार्डोच्या 'द वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' या चित्रपटातील एक दृश्य ज्यात तो एका इसमाला पेन विकायला सांगतो, त्याचा संदर्भ घेऊन राजकुमार राव म्हणतो, ''लियो भाई, केम छो? अरे, लियो भाई, हे पेन ही तुमची कथा आहे. पण हे रिफील हा तुमचा हिरो आहे. त्यामुळे हिरोला विका. कथेला नाही." एका मिनिटाच्या या व्हिडिओचा शेवट लियोनार्डो कौतुकाने टाळ्या वाजवत होतो.

हा व्हिडिओ पाहा:

 

 

View this post on Instagram

 

When Raghu bhai met Leo bhai.

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on

(हेही वाचा. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान खुराना सोबत रोमांन्स करताना दिसणार राजकुमार राव?)

'मेड इन चायना' चित्रपटाची कथा ही एका जुगाड करणाऱ्या उद्योजकाची आहे. चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण हे चायना मध्येच झालं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे याने केले आहे. 2016 ला 'रॉंग साईड राजू' या गुजराती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मिखिलचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. मौनी रॉय (Mouni Roy), परेश रावल (Paresh Rawal), गजराज राव (Gajraj Rao), बोमन इराणी (Boman Irani) यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे.