बॉलिवूड कलाकारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा ग्रँड सेल्फी पाहिलात का?
नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड कलाकार सेल्फी फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

बॉलिवूडमध्ये सध्या गाजत असलेल्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबतचा ग्रँड सेल्फी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर हा फोटो रणवीर सिंगने क्लिक केला असून सर्वजाणांचे लक्ष प्रथम रणवीरच्या लूककडे जात आहे.

मनोरंजनाच्या माध्यमातून देशात उत्तम राष्ट्राची निर्मिती आणि समाज घडावा यासाठी चित्रपटांनी दिलेले योगदान खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच बॉलिवूड कलाकारांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. तर जीएसटीबाबत केलेल्या बदलांसाठी ही मोदींचे कलाकारांनी आभार मानले आहेत. याबाबतीत खुद्द करण जोहरने तिकिटांच्या दरातील जीएसटीबाबत ट्वीट केले आहे.

या सेल्फीमध्ये करण जोहर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट, एकता कपूर, विकी कौशल, आयुषमान खुराना, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, भूमी पेडणेकर आणि रोहित शेट्टी दिसून येत आहेत. तर काही दिवसांपूर्वी मोदींनी चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली होती. त्यावेळी निर्मात्यांच्या समस्या जाणून घेऊन जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.