Challa Song : Uri चित्रपटातील 'छल्ला' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
उरी चित्रपट (फोटो सौजन्य- ट्विटर)

सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) वर आधारित उरी(Uri)चित्रपटातील पहिले गाणे 'छल्ला'(Challa) हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तसेच अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा जवानाच्या मुख्य भुमिका साकारणार आहे.

छल्ला या गाण्यामध्ये विकी कौशल हा त्याच्या शहीद झालेल्या साथीदारांचा बदला घेण्यासाठी जवानांना ट्रेनिंग देताना दाखविले आहे. या चित्रपटाचे हे गाणे कुमार यांनी लिहिले असून रोमी, विवेक हरिहरण आणि शाशवत सचदेव यांनी गायले आहे.

उरी चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. तसेच 11 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.