Parineeti Chopra-Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री परीनीती चोपरा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा सप्टेंबर 2023 रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. 13 मे रोजी दिल्लीत कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थितीत साखरपूडा केला. ETimes च्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघवच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे आणि लग्नाचे ठिकाणही दोन्ही कुटुंबांनी निश्चित केले आहे. वृत्तानुसार, हे जोडपे 25 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत आणि नंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अभिनेत्री लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहे. एका स्रोताने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की या जोडप्याचे आई वडिल, पवन चोप्रा-रीना चोप्रा आणि सुनील चढ्ढा-अलका चढ्ढा यांनी आधीच गुरुग्राममधील हॉटेलमध्ये जेवणाची चव घेतली आहे. हे जोडपे जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसला या लग्नाचे ठिकाणी लग्न करणार आहे, त्याच ठिकाणी प्रियंका आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये लग्न केले होते.
बॉलिवूडची अभिनेत्री परिनीती सोशल मीडियावर हीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. चाहत्यांना ही आंनदाची बातमी मिळताच, शुभेच्छाच्या कंमेट देत आहे. हे जोडपे लंडनमध्ये इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यांनी यूकेमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि "भारत-यूके डायस्पोरा लिव्हिंग ब्रिजला बळ देण्यासाठी" त्यांचा सत्कार करण्यात आला.