Tula Japnar Aahe Song in Khari Biscuit: भावा बहिणीच्या नात्याला हळूवारपणे हात घालून डोळ्यांच्या कडा ओल्या करेल खारी बिस्कीट चित्रपटातील हे हृद्यस्पर्शी गाणे, नक्की ऐका
Khari Biscuit Song (Photo Credits: YouTube)

जगावं ते त्या एका व्यक्तीसाठी तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी, जी आपल्यासाठी कधी भाऊ बनणारी, कधी बाबा बनणारी, कधी आई बनणारी अशी आपली ताई. अशा शब्दांत ताईचे वर्णन भाऊ-बहिणीतील गोड, खोडकर नात्यावर हळूवारपणे फुंकर घालणारे खारी बिस्कीट (Khari Biscuit) या चित्रपटातील 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe) हे गाणे नुकतच प्रदर्शित झाले आहे. भावा-बहिणीच्या नात्याचे भावविश्व अलगदपणे मांडणारे हे गाणे मराठीतील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि गायिका रोंकीनी गुप्ता (Ronkini Gupta) यांच्या आवाजात स्वरबद्ध केले आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित खारी बिस्कीट हा चित्रपट येत्या 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आपल्या अंध बहिणीला आपल्या डोळ्यांनी सारं जग दाखवण्यासाठी भावाची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आज (15 ऑक्टोबर) या चित्रपटातील 'तुला जपणारं आहे' हे हृद्यस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला गायक आदर्श शिंदे आणि रोंकीनी गुप्ता यांच्या आवाजा दिल्याने हे गाणं प्रेक्षकांच्या अगदी हृद्याला भिडेल.

क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे लिहिले असून अमितराज या गाण्याचे संगीतकार आहेत. या चित्रपटात वेदश्री खाडिलकर (Vedashree Khadilkar)आणि आदर्श कदम (Adarsh Kadam) बालकलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या सोबत सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते हे बालकलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

त्याचबरोबर संजय नार्वेकर, सुशांत शेलार, नंदिता धुरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसतील. भावंडांच्या नात्याचा एक वेगळा पैलू आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

हेदेखील वाचा- Nagin Dance Song: आदर्श शिंदे च्या आवाजात 'कागर' सिनेमातील नवं दमदार गाणं 'नागीण डान्स' (Watch Video)

भाऊ-बहिणींच्या नात्यावर अनेक चित्रपट आले मात्र याची कथा थोडीशी हटके असून प्रेक्षकांना ती नक्की आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे.