Triple Seat Movie Poster (Photo Credits: Instagram)

Triple Seat Movie Poster: बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) मध्ये सीझनच्या सुरूवातीपासूनच चर्चेत असलेल्या नावांपैकी एक म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani Surve). आज (28 ऑगस्ट) शिवानीचा वाढदिवस आहे. बिग बॉसच्या घरात तिच्या बर्थ डे चं सेलिब्रेशन कसं असेल हे ठाऊक नाही पण बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिवानीचे दोन सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये 'ट्रिपल सीट' (Triple Seat) आणि 'सातारचा सलमान' (Satarcha Salman) या सिनेमामधून ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज शिवानीच्या बर्थ डेचं औचित्य साधून 'ट्रिपल सीट' सिनेमाचं खास पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. या सिनेमात शिवानी सोबत अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण? (Photos)

शिवानी सुर्वे आजारपणाचं कारण देऊन घराबाहेर पडली होती. पण काही आठवड्यातच तिने बिग बॉसच्या घरात कमबॅक केलं आहे. यंदा बिग बॉसच्या फायलिस्टमध्ये तिकीट टू फिनाले द्वारा शिवानीची टॉप 2 मध्ये निवड करण्यात आली आहे. आता विजेतेपदावर ती स्वतःचं नाव कोरणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण त्याआधीच शिवानीच्या फॅन्सला तिच्या टीमकडून शेअर करण्यात आली आहे.

शिवानी सुर्वेचं 'ट्रिपल सीट' पोस्टर

'ट्रिपल सीट' नंतर शिवानी हेमंत ढोमेच्या 'सातारचा सलमान' या सिनेमामध्येही दिसणार आहे. यापूर्वी शिवानी सुर्वे 'घंटा' सिनेमामध्ये झळकली आहेत. आता शिवानी पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'ट्रीपल सीट' हा सिनेमा येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला रीलीज होणार आहे.