थर्डक्लास राजकारण! महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले
Sharad Ponkshe (PC - Facebook)

शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. सध्या महाराष्ट्राचे राजकारण सर्व बाजूंनी तापलेलं आहे. राज्यात सध्या परस्पर विरोधी विचारसारणी असलेले पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करताना पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व घटना देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहेत. शनिवारी पार पडलेल्या शपथग्रहण प्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या फेसबुक पेजवरून 'थर्डक्लास राजकारण', अशी पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा- मुख्यमंत्री शपथविधी या घटनाबाह्य कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रवादीने काँग्रेसचा पोपट केला; प्रकाश आंबेडकरांचा टोला)

शरद पोंक्षे फेसबुक पोस्ट - 

यासंबंधी लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. आपल्याला ज्या पक्षाची विचारसारणी पटते किंवा ज्या पक्षाने सत्तेत यावं असं आपल्याला वाटतं त्या पक्षाला आपण मतदान करतो. मात्र, जर निवडणुकीनंतर परस्पर विरोधी विचारसारणी असलेले पक्ष सत्ता स्थापनेचा विचार करत असतील, तर हा लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान आहे. हा लोकांच्या हक्काचा आणि त्यांच्या मतांचा अनादर आहे, असंही पोंक्षे म्हणाले.

हेही वाचा - मी 'पवार' साहेबांचा प्रतिनिधी पक्षाची साथ सोडणार नाही! बेपत्ता असणाऱ्या आमदार दौलत दरोडा यांचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

भाजपने केलेलं हे कृत्य अत्यंत वाईट आहे. त्यांना कोणालाही न सांगता शपथविधी पार पडण्याची काय गरज होती? सत्ता स्थापनानेची प्रक्रिया पारदर्शी असायला हवी आणि तसं नसेल करायचं तर देशात हुकूमशाहीच लागू करा, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.