महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकाएकी उलथापालथ घडवणारा कालचा मुख्यमंत्री शपथविधी (CM Oath Taking) सर्वांसाठीच धक्का होता, मात्र यामध्ये अचंबित होण्यासारखे काही नाही , राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अगोदरपासूनच भाजपच्या संपर्कात होते आणि मगच रीतसर हा निर्णय घेऊन काँग्रेस (Congress) व शिवसेनेचा (Shivsena) पोपट करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Aambedkar) यांनी दिली आहे. याशिवाय काळ राजभवनात पार पडलेला शपथविधी हा कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय झाल्याने निश्चितच हा एक घटनाबाह्य कार्यक्रम आहे असेही आंबेडकर म्हणाले.
सत्तास्थापनेच्या घडामोडींवर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडलेल्या मतांनुसार," ज्या पध्दतीने राज्यपालांनी शपथ दिली, हे घटनेला धरून नाही. राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रमाची कल्पना द्यायला पाहिजे होती. लोकांना विश्वासात घेतले गेले नाही" त्यामुळे याला कोंटेच वैध रूप प्राप्त होत नाही. Maharashtra Government Formation Live Update: अजून एक आमदार राष्ट्रवादीत परतणार- नवाब मलिक
दरम्यान, मुख्यमंत्री शपथविधी हा जर का हा अचानक घडलेला कार्यक्रम नसेल तर राष्ट्रवादीने मिळून शिवसेना व काँग्रेसचा पोपट केला असेल अशीही टीका आंबेडकर यांनी केली. "राष्ट्रवादीचे काही नेत्यांची भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी भेट झाली. दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली .शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे पत्र घेऊन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत तासभर चर्चा केली. या भेटीमागील राजकारण समजणार नाही, एवढे दुधखुळे आम्ही नाही" त्यामुळे हा एक रीतसर प्लॅन होता असे म्हणता येईल असेही आंबेडकर यांनी पत्रकारांसमोर म्हंटले आहे.