मी 'पवार' साहेबांचा प्रतिनिधी पक्षाची साथ सोडणार नाही! बेपत्ता असणाऱ्या आमदार दौलत दरोडा यांचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
NCP MLA Daulat Daroba (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकीय नाट्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे दोन बेपत्ता झालेले आमदार. यातील शहापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार दौलत दरोडा (NCP MLA Daulat Daroda)  यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील शेअर करण्यात आला असून, यामध्ये दौलत यांनी आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली, सोबत पक्षातील आमदार फुटण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपण शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या तिकिटावर निवडून आलेले उमेदवार आहोत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पक्षाची साथ सोडणार नाही असे आश्वासन देखेल दिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार एकत्रितरित्या जो निर्णय घेतील त्याला मी बांधील राहीन असेही दौलत यांनी व्हिडिओमध्ये सांगितले.

Maharashtra Government Formation Live Update: शरद पवार रेनेसॉं हॉटेलमध्ये आमदारांच्या भेटीला

दौलत दरोडा हे काल सत्तास्थापन झाल्यापासून बेपत्ता होते, त्यांचे पुत्र करण दरोडा यांनी या प्रकरणी पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती त्यापाठोपाठ शहापूर येथील माजी आमदारांनी सुद्धापोलिसांना याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती केली होती. दुसरीकडे काल माध्यमांमधय दौलत दरोडा हे दिल्लीला जाताना दिसल्याचे फोरो देखील व्हायरल झाले होते, त्यामुळे नेमकी माहिती कोणती याबाबत संभ्रम होता. मात्र आता या व्हिडिओतून स्वतः दौलत यांनीच आपल्या बेपत्ता असण्याबाबतचा खुलासा केला आहे.

दौलत दरोडा VIDEO

दरम्यान, याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे आणखीन एक आमदार म्हणजेच नाशिकचे नितीन पवार देखील कालपासून आपल्या निवासी परतलेले नाहीत, त्यांची शोध सध्या सुरु आहे. येत्या दिवसात राज्यात फोडाफोडीचे राजकारण दिसण्याची शक्यता असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांच्या सुरक्षेत बारकाईने लक्ष घालत आहे.