सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, अवधूत गुप्ते यांच्यासह मराठी कलाकारांचे राज्यातील पूरग्रस्तांना काळजी घेण्याचे आवाहन
Sai Tamhankar, Tejaswini Pandit, Avadhoot Gupte (Photo Credits: Twitter)

गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी मदतीसाठी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराचं पथक रवाना झाले असून स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीसाठी सज्ज झाले असताना अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे कोल्हापूर, सांगली येथील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, अवधूत गुप्ते, सुबोध भावे, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. (रायगड, कोल्हापूर,सातारा, सांगली मध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीचे; पुणे शहरात 137% पाऊस)

सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, धरणं ओव्हलफ्लो झाली असून याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. पूरपरिस्थितीमुळे काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून आज ते कोल्हापूर दौरा करणार आहेत. राज्यातील या पूरग्रस्त परिस्थितीवर मराठी कलाकारांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

तेजस्विनी पंडीत ट्विट:

सई ताम्हणकर ट्विट:

अवधूत गुप्ते ट्विट:

सुबोध भावे ट्विट:

रितेश देशमुख ट्विट:

यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूराचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील कलाकार मंडळींनाही बसला आहे.