
मागील काही दिवसांपासून कोल्हापूरात पावसाने थैमान घातलं आहे. सतत कोसळणार्या पावसामुळे बघता बघता मागील 30 वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे. 50,000 हून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. धरण आणि नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने सर्वत्र पूराचं साम्राज्य पसरलं आहे. पूराचा फटका सामान्यांसोबत कलाकारांनाही बसला आहे. तुझ्यात जीव रंगला (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेचं शूट कोल्हापूरामध्ये होतं. पण पूराचा फटका बसल्याने मागील दोन दिवसांपासून शूटिंगही रद्द करण्यात आलं आहे. तसेच अश्रूंची झाली फुले नाटकाचा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.Kolhapur Rains: पूराच्या वेढयात अडकलेल्या कोल्हापूरवासीयांना एअर लिफ्ट करण्यासाठी नौसेनेची हेलिकॉप्टर्स रवाना
कलाकारांनी पावसाचं पाणी जसं वाढायला लागलं तसं शुटींग रद्द करून सुरक्षित स्थळी जाण्याचा पर्याय निवडला. सध्या मालिकेची कलाकार आणि इतर तंत्रज्ञ मंडळी हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी रवाना झाली आहेत. गुडघाभर पाण्यातून रस्ता काढत जात असल्याचे आणि पूराच्या पाण्यात अडकून पडल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ कलाकारांनी सोशल मीडियात शेअर केले आहेत.

कोल्हापूरात पूराचे पाणी सर्वत्र असल्याने 'अश्रूंची झाली फुले' नाटकाचे प्रयोगही रद्द केले आहेत. सोशल मीडीयाच्या माध्यमातून या नाटकातील प्रमुख कलाकार सुबोध भावे याने देखील कोल्हापूर, सांगली वासियांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. आत्ताचा दौरा रद्द करून लवकरच पुन्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये येऊ असे सांगितले आहे.
सुबोध भावे पोस्ट
कोल्हापूर,सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी आजपासून सुरु होणारे "अश्रूंची झाली फुले"चे प्रयोग रद्द करत आहोत.
तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही.
आधी तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या,सुरक्षित व्हा.
नाटकाचा प्रयोग घेऊन आम्ही परत येऊ. pic.twitter.com/14vrShZCro
— सुबोध भावे (@subodhbhave) August 7, 2019
कोल्हापूरमध्ये 30 वर्षातील विक्रमी पाऊस पडला आहे. पुराचा फटला कोल्हापूरातील अनेक गावांना बसल्याने नौसेना, लष्कर यांच्यासह एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.