Navy Flood Relief Teams (Photo Credits: Twitter)

Kolhapur Rains 2019 Updates: महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला मान्सून मुंबई, ठाणे, कोकण सह आता कोल्हापूर आणि सांगली शहराला देखील झोडपून काढत आहे. मागील 2-3 दिवसात कोल्हापूरात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील मागील 30 वर्षातील पावसाचे सारे विक्रम मोडीत निघाले आहेत. जलमय झालेल्या या भागामध्ये आता नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथकासोबत स्थानिक प्रशासन आणि आता नौसेनेचीदेखील मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी खास हेलिकॉप्टर दाखल झाली असून लवकरच नागरिकांना एअरलिफ्ट करून पूराच्या वेढ्यातून बाहेर काढले जाणार आहे. कोल्हापूरातील 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबातील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर.नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक,गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर एयरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहे.

कोल्हापूरात आज सकाली राजाराम बंधारा पाणी पातळी धोकादायक स्तरावर पोहचली आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे 111 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी रस्ते वाहतूक, स्थानिक जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सांगली नाक्याजवळ बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर सातारा हायवे वाहतूक पाणी साचल्याने बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस घेणार मंत्रिमंडळाची खास बैठक

ANI Tweet

कोल्हापूर शहराला पावसाने झोडपून काढल्याने आज शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच कालपासून दूध संकलन देखील बंद करण्यात आलं आहे.