महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी पावसाच्या जोरदार माऱ्याने हजारो नागरिक त्रस्त झाल्याचे वृत्त मागील आठवड्यात वारंवार समोर येत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत पावसाचा जोर किंचित ओसरला असला तरी कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) भागामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उद्या मुंबईत मंत्रिमंडळाची एक खास बैठक घेणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे कोल्हापूर व सांगली विभागात पुरामुळे झालेल्या अवस्थेवर चर्चा होणार आहे.Maharashtra Monsoon 2019 Live Updates: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचावकार्याला सुरुवात
ANI ट्विट
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has called a cabinet meeting tomorrow in Mumbai to review the flood situation in the state, particularly in Kolhapur & Sangli. pic.twitter.com/AabcQQT8jT
— ANI (@ANI) August 6, 2019
कोल्हापूर, सांगली भागामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाचा कहर असल्याने पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जात आहे. तसेच एअरलिफ्ट साठी हेलिकॉप्टर सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. पावसामुळे दैनंदिन जीवनासोबतच व्यापाराला देखील मोठा फटका बसला आहे, महापूराची स्थिती असलेल्या कोल्हापूरात आज दूध संकलन थांबवण्यात आलं आहे.तर दुसरीकडे सांगली मध्ये देखील पावसाचा हाहाकार कायम आहे.
दरम्यान पावसाचा जोर अधिक असल्याने प्रशासनाला सर्व ठिकाणी नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याची करणी काही ठिकाणाहून देण्यात येत असली तरी नागरीयुकणां आपत्तीजन्य परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक ठिकाणी बचावकार्य सुरु आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या बोलवण्यात आलेल्या बैठकीत काही ठोस निर्णय घेतला जाणार का हे पाहणे महत्वाचे आहे.