
Full And Final Winner List Of Maharashtracha Favourite Kon: मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध पुरस्कार सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' गेले अनेक वर्ष सुरु असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचा सन्मान तर केलाच जातो पण त्याचसोबत या सोहळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे यातील विजेत्यांची निवड हे परीक्षक करत नसून स्वतः प्रेक्षक करतात. या सोहळ्याचं चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पार पडलं असून आज हा सोहळा टेलिकास्ट करण्यात येत आहे.
यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनची धुरा सांभाळली वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांनी. चला तर पाहूया विजेत्यांची संपूर्ण यादी,
महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक: संजय जाधव
महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट: हिरकणी
महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता: ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता: प्रसाद ओक (हिरकणी)
महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री: मृणाल कुलकर्णी (फत्तेशिकस्त)
महाराष्ट्राचा फेवरेट गायक: आदर्श शिंदे (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राची फेवरेट गायिका: रोंकीणी गुप्ता (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचे फेवरेट गीत: अमितराज (खारी बिस्कीट)
महाराष्ट्राचा फेवरेट पॉप्युलर फेस: शिवानी सुर्वे
महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन: अंकुश चौधरी
गोल्डन दिवा अवॉर्ड: मृणाल ठाकूर
विशेष म्हणजे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 'खारी बिस्कीट' या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संजय जाधव यांनी 'फेवरेट दिग्दर्शक' हा पुरस्कार मिळवला. सोनाली कुलकर्णी हिने 'फेवरेट अभिनेत्री' चा 'किताब पटकावला तर 'फेवरेट अभिनेता' ठरण्याचा मान ललित प्रभाकर याला मिळाला.