Luckee Song Majhya Dila Cho:आळंदीच्या चैतन्य देवढेच्या आवाजात 'माझ्या दिलाचो..' कोंकणी गाणं, 'लकी' सिनेमातील नवं गाण
Majhya Dila Cho Song (Photo credits: You Tube and Twitter)

Luckee Song Majhya Dila Cho: 'शोधू जरा कोपचा' या लकी सिनेमातील पहिल्या सुपरहीट गाण्यानंतर आज 'माझ्या दिलाचो'(Majhya Dila Cho) हे कोंकणी बाजाचं गाणं रीलिज करण्यात आलं आहे. सुर नवा ध्यास नवा या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक चैतन्य देवढेच्या (Chaitanya Devadhe) आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. अभंग आणि माऊलींच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करणार्‍या चैतन्याच्या आवाजात 'माझ्या दिलाचो..' हे सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं ऐकण्याची मज्जा काही औरच आहे. Luckee Trailer: अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यामधील धम्माल कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमा 'लकी' चा ट्रेलर 

पंकज पडघन या संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला चैतन्यने स्वरसाज चढवला आहे. चित्रपटामध्ये अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. 'लकी' या मराठी सिनेमामध्ये पंकज पडघन आणि अमितराज या दोन संगीतकारांनी गाणी दिली आहेत. चैतन्य देवढे हा 'सूर नवा...' च्या अंतिम सहा स्पर्धकांपैकी एक आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा निकाल लागण्यापूर्वीच चैतन्यला सिनेमासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे.  जितेंद्रच्या स्टाईलमध्ये अभय महाजन म्हणतोय 'शोधू जरा कोपचा', वैशाली सामंत सोबत Bappi Lahiri पहिल्यांदा मराठीत!

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून अभय महाजन आणि दीप्ती सती ही जोडी पदार्पण करणार आहे. धम्माल कॉमेडी आणि रोमॅन्टिक अंदाजात एक हटके प्रेमकहाणी मराठी रसिकांना पाहता येणार आहे.