Luckee Trailer: अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यामधील धम्माल कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमा 'लकी' चा ट्रेलर लॉन्च (Video)
Luckee Trailer (photo Credits: Facebook)

Luckee Trailer:  अभय महाजन (Abhay Mahajan)  आणि दीप्ती सती (Deepti Sati) या नव्या जोडीला घेऊन संजय जाधव (Sanjay Jadhav) यांचा आगामी सिनेमा 'लकी' रसिकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईत दिमाखदार सोहळ्यात 'लकी' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमाला बप्पी लहरी आणि जितेंद्र या कलाकारांची विशेष उपस्थिती होती. पोस्टरपासूनच सोशल मीडियामध्ये 'लकी' सिनेमाबद्दल चर्चा वाढली होती. आता ट्रेलर पाहून तुमची उत्सुकता अधिक वाढणार आहे.  जितेंद्रच्या स्टाईलमध्ये अभय महाजन म्हणतोय 'शोधू जरा कोपचा', वैशाली सामंत सोबत Bappi Lahiri पहिल्यांदा मराठीत!

'लकी' सिनेमाचा ट्रेलर

'लकी' या आगामी सिनेमात अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमामध्ये एका सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या एका तरूणाची 'फॅन्टसी' दाखवण्यात आली आहे. आपल्या इतर मित्रांप्रमाणे आपलीदेखील गर्लफ्रेंड असावी अशी इच्छा असणारा तरूण कॉलेजमध्ये गेल्यावर तिला पटवण्यासाठी काय काय करतो याची धम्माल कॉमेडी 'लकी' सिनेमात दाखवण्यात आली आहे. अभय महाजनसोबत दीप्ती सती ही अभिनेत्री झळकणार आहे.

संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रीलिज होणार आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक राणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.