Luckee Movie Poster & Song : जितेंद्रच्या स्टाईलमध्ये अभय महाजन म्हणतोय 'शोधू जरा कोपचा', वैशाली सामंत सोबत Bappi Lahiri पहिल्यांदा मराठीत!
Luckee Marathi Movie Poster (Photo Credit : Instagram)

Luckee Movie Poster & Song : मराठी सिनेसृष्टीतील स्टार दिग्दर्शक संजय जाधवचा (Sanjay Jadhav) नवा सिनेमा 'लकी' (Luckee) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि पहिले गाणे आऊट झाले आहे. या सिनेमात संजय जाधवने नेहमीच्या स्टार कलाकारांना न घेता नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे. अभय महाजन (Abhay Mahajan) आणि दिप्ती सती (Dipti Sati) या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या पोस्टरवर अभय महाजन हॉट लूकमध्ये दिसत आहे.

पोस्टरनंतर सिनेमातील पहिले गाणे देखील समोर आले आहे. 'कोपचा' (Kopcha) असे हे गाणे असून वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या माध्यमातून बप्पी लहरी पहिल्यांदाच मराठीत पर्दापण करत आहेत. यात अभय-दिप्ती आपल्याला 'नैनो में सपना' गाण्यातील जितेंद्र-श्रीदेवीच्या स्टाईलमध्ये दिसत आहेत.

'लकी' सिनेमा 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी 'दुनियादारी,' 'ये रे ये रे पैसा,' 'गुरु,' 'तु ही रे' यांसारखे हिट सिनेमे दिल्यानंतर संजय जाधवच्या या सिनेमात वेगळे काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.