Lata Mangeshkar Puraskar 2023: जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 (Gansamradni Lata mangeshkar puraskar 2023)  हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज घोषणा केली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आल्याची घोषणा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.    (हेही वाचा - Uddhav Thackeray On Eknath Shinde: हे सरकार नेभळट असून चोर आणि गद्दार आहेत; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल)

'राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे , तसेच यासाठी आपण तत्पर आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर म्हटले. यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांना जाहीर झालेला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान दिल्याने सुरेश वाडकरांना यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 हा पंडित उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले आहे. तर 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 यासाठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर 2023 साठी अशोकजी समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.