Kaagar Darval Mavhacha Song: रिंकू-शुभंकर यांचा रोमॅन्टीक अंदाज असलेलं कागर सिनेमातील 'दरवळ मव्हाचा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Darval Mavhacha | Kaagar Song | (Photo Credits: Youtube)

Rinku Rajguru's Movie Kaagar Song: सुपरहिट मराठी सिनेमा सैराट (Sairat) मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिचा नवा सिनेमा 'कागर' (Kaagar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर, गाणी प्रदर्शित झाली असून आता सिनेमातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात रिंकू राजगुरु आणि शुभंकर तावडे यांचा रोमांटिक अंदाज पाहायला मिळत आहे. आदर्श शिंदे च्या आवाजात 'कागर' सिनेमातील नवं दमदार गाणं 'नागीण डान्स' (Watch Video)

कविता राम, विवेक नाईक, राहुल चिटनीस आणि संतोष बोटे यांनी हे गाणे गायले असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. 'मरवळ मव्हाचा बाई' असे या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांच्या लेखणीतून अवतरले आहेत.  (रिंकू राजगुरु हिच्या 'कागर' चित्रपटातील पहिलं गाणं You Tube वर प्रदर्शित)

पहा गाणे:

'कागर' सिनेमा हा मकरंद माने यांनी दिग्दर्शित केला असून व्हायकॉम 18 आणि उदारणार्थ या संस्थांनी निर्मिती सुत्रं सांभाळली आहेत. ग्रामीण राजकारण आणि प्रेमकथा असलेला हा सिनेमा 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.