अगं बाई! 'तिल गुड घ्या गोड गोड बोला' गुढी पाडव्याच्या शुभेच्छा; अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा नवा शोध
Bhumi Pednekar wishes | ( (Photo credit: Twitter/@bhumipednekar)

Happy Gudi Padwa 2019: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना केलेली गडबड अभिनेत्री भूमि पेडणेकर (Actress Bhumi Pednekar) हिच्या चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा देताना भूमी पेडणेकर हिने चक्क तिळगूळ घ्या गोड बोला म्हटले आहे. गुढी पाडव्याला मकर संक्रांती ( Makar Sankranti) शुभेच्छा पाहून नेटीझन्सनी तिला चांगलेच ट्रोल केले.

विशेष म्हणजे भूमीने पाडव्यानिमित्त संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यासुद्धा तिला साध्या मराठीत देता आल्या नाहीत. ट्विटरवरुन शुभेच्च्छा देताना तिने 'तिल गुड घ्या, गोड गोड बोला' असं हिंदीमीश्रित मराठीचा आधार घेत भूमिने शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच #HappyGudiPadwa #GoodMorning #marathimulgi #happynewyear असे हॅशटॅगही दिले आहेत.

भूमी पेडणेकर ही पूर्ण मराठी पार्श्वभूमीची आहे. तिचं बालपणही मुंबईत गेले आहे. तिला छान मराठीही बोलता येतं. तसेच, तिचं शालेय शिक्षणही जुहू येथील आर्य विद्यामंदिर शाळेत झाल्याचे सांगितले जाते. अलिकडील काळात तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्या टॉयलेट एक प्रेमकथा अशा सुप्रसिद्ध सिनेमाचाही समावेश आहे.

Bhumi Pednekar wishes | ( (Photo credit: Twitter/@bhumipednekar)

दरम्यान, भूमिने हॅशटॅग देताना वापरलेला #marathimulgi हा हॅशटॅगही लोकांच्या टीकेचे कारण ठरला आहे.