Yashwant Dev | (Photo Credits- Twitter)

जेष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव याचं आज पहाटे ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतल्या  शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अर्थातच मराठी संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार आणि नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पण प्रसिद्ध हिंदी कवी आणि आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी खास मराठीत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी 'शुभ्र तुरे माळून आल्या' हे गाणंं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे त्यांनी या गाण्याची लिंक सुद्धा जोडली आहे. नक्की वाचा: संगीतकार यशवंत देव यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली, मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना.

पहा कुमार विश्वास याचं  ट्विट

मराठी कालारांनी सुद्धा यशवंत देवांना आदरांजली वाहिली. सलील कुलकर्णी, स्पृहा जोशी, स्वप्नील जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे तसेच प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सलील कुलकर्णी यांनी फेसबुक वर आदरांजली वाहिली

'असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे' असं लिहून अभिनेत्री स्पृहा जोशीने देवांना आदरांजली वाहिली 

महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची श्रद्धांजली 

मराठी चित्रपट आणि भावगीत यांच्या सोबत देवांनी नाटकांसाठी सुद्धा संगीत दिले. तसेच त्यांनी काही गाणी लिहिली सुद्धा होती. ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘येशील येशील’, ‘असेन मी नसेन मी’, ‘जीवनाची ही घडी अशीच राहू दे’ अशी अजरामर गाणी देवांनी रसिकांना दिली.