संगीतकार यशवंत देव यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली, मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना
यशवंत देव निधन photo credit : youtube

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं वयाच्या 91 व्या वर्षी दीर्घ आजारपणामुळे निधन झाले आहे. दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. यशवंत देव यांच्या जाण्याने रसिकांसोबतच कलाकारांनीही  हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशवंत देव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृध्द करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, अनेक भावगीतांसह यशवंत देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील. एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे.