
कलर्स टीव्हीवरील (Colors Tv) प्रसिद्ध आणि वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस 15’ला (Bigg Boss 15) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये या वीकेंडला वाइल्डकार्डच्या माध्यमातून काही खास व्यक्ती दाखल होणार होते. यामध्ये बिग बॉस मराठी सीझन 2 चा स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांच्या नावाचा देखील समावेश होता. पण अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे (Wild Card Entry) बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असलेले अभिजीत बिचुकले यांना कोरोनाची लागण झाल्याची महिती समोर येत असल्यामुळे यांची एन्ट्री तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
नुकतंच बिग बॉस हिंदीच्या वीकेंड का वॉर या भागात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली होती. यात रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले यांचा समावेश होता. मात्र मिळालेल्या वृत्तानुसार, अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे नाव या शो मधून रद्द केल्याची महिती मिळत आहे. अभिजीत बिचुकले यांना करोनाची लागण झाल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (हे ही वाचा Salman Khan येणार या आठवड्यात Bigg Boss Marathi 3 च्या चावडीवर; पहा प्रोमो.)
अभिजीत बिचुकले हे येत्या सोमवारी बिग बॉस घरात जाणार होते. पण त्याना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. विशेष म्हणजे अभिजीत बिचुकलेंऐवजी आता निर्मात्यांनी वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी राखी सावंतची निवड केली आहे. निर्मात्यांनी याबाबतचा प्रोमोही रिलीज केला आहे.
View this post on Instagram
अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा राहिलेला आहे. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवली आहे, मात्र आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यानां यश मिळाले नाही. बिचुकले हे सुरुवातीपासुन स्थानिक पातळीवर फेमस होतेच. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यामुळे त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि आता ते कलर्स टीव्हीवरील 'बिग बॉस 15’ मध्ये एंट्री करणार होते त्यामुळे ते अजुन जास्तच चर्चेत आले होते.