मराठी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील नामवंत गायग, संगितकार अवधूत गुप्ते यांच्या आई मृदगंधा गोखले यांचे निधन (Avadhoot Gupte Mother Death) झाले आहे. मृदगंधा पाठिमागील काही दिसांपासून प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने अवधूत गुप्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अंत्यदर्शनानंतर मृदगंधा गुप्ते यांच्या पार्थीवावर बोरिवली पूर्व दौलतनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अवधूतची भेट घेत त्याचे सांत्वन केले आहे. एका मुलाखतीमध्ये अवधूतने त्याच्या आईच्या आजारपणाविषयी सांगितले होतं. आईच्या आजाराबाबत त्यांनी म्हटले होते की, 'थोडा काळ आमच्यासाठी त्रासदायक होता, पण शेवटी आम्ही जिंकलो. माझ्या आईला चेन्नई येथील रुग्णालयात मिळालेल्या उपचारांचा खूप फायदा झाला. (हेही वाचा, Noor Malabika Das Dies: अभिनेत्री नूर मलाबिका दासची लोखंडवाला येथे फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू)
मृदगंधा गुप्ते यांनी वैद्यकीय उपचारांनना सुरुवातीला दाद दिली. मात्र, नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अवधूत कायमच त्याच्या आईविषयी भरभरुन बोलायचा. अनेक मुलाखतीमध्ये आईसोबत असलेल्या नात्यावर त्याने भाष्य केले आहे. आई ही माझी पहिली मैत्रिण आहे असे देखील अवधूत म्हणाला होता.त्याने म्हटलं की, 'आई मला नेहमी सांगायची की, आपल्या सभोवतालच्या लोकांशी प्रेमाने वागत राहा.पण मात्र आता आईच्या निधनाने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनाने अवधूतला मोठा धक्का बसला आहे.