Noor Malabika Das Dies: अभिनेत्री नूर मलाबिका दासची लोखंडवाला येथे फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, ओशिवरा पोलिसांकडून तपास सुरू
Photo Credits X

Noor Malabika Das Dies: अभिनेत्री आणि एअर होस्टेस राहिलेल्या नूर मलाबिका दास(Noor Malabika Das ) हीने मुंबईतील लोखंडवाला येथील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 6 जून रोजी अभिनेत्रीने आत्महत्या केली. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या(Suicide by Hanging) केली. 3 दिवस तिचा मृतदेह फ्लॅटमध्येच होता. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं, दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर पोलिसांना नूरचा कुजलेला मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. (हेही वाचा: Singer Mandisa Dies: राहत्या घरात आढळला गायिका मंडिसाचा मृत्यू,कुटुंबाला धक्का; तपास सुरु)

पोलिसांनी तपासादरम्यान घरातून औषधे, तिचा मोबाईल फोन आणि एक डायरी जप्त केली. अभिनेत्रीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या नूर मलाबिका दास हिच्या कुटुंबीयांशी पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट एनजीओच्या सहाय्याने 9 जून रोजी तिचे अंतिम संस्कार केले.

नूर मलाबिका दास मूळची आसामची होती. तिने उल्लू ॲप आणि वेब सीरिजमध्ये तीखी चटनी, सिसियान, वॉकमन, चरमसुख, जगन्या उपया, देखी अंधेखी, बॅक्रोड हसले आणि बरेच काही यासह असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती.