Singer Mandisa Dies: जगभर प्रसिध्द असलेली गायिका मंडिसाचा मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या निधनाने चाहत्यांना आणि मित्रपरिवारात धक्का बसला आहे. मंडिसा अमेरिकन आयडॉल सीझन ५ मुळे आणि ग्रॅमी पुरस्काराने प्रसिध्द झाली होती. मंडिसा ही अमेरिकन सिंगर होती.  सोशल मीडियावरील अकाऊंटवरून तिच्या निधनाची माहिती देण्यात आली. मंडिसाने वयाच्या ४७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पोलिसांना घटनेची माहिती देताच, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा-  पत्नीस देण्यात आले Toilet Cleaner मिसळलेले जेवण; इमरान खान यांचा पाकिस्तानच्या तुरुंगातून दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)