Imran Khan | (Photo Credit: Facebook)

Imran Khan And Bushra Bibi Corruption Case: माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी आरोप केला आहे की, त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात असताना टॉयलेट क्लिनर (Toilet Cleaner) मिसळलेले दूषित अन्न देण्यात आले. खान हे सध्या विविध प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात आहेत. तुरुंगातूनच त्यांनी हे आरोप केले आहेत. बीबी यांची प्रकृती दूषित आणि विषारी अन्नपदार्थांचे नियमीत सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पोटामध्ये संसर्ग झाला आहे आणि त्यांचा त्रास अधिकच वाढत असल्याचेही खान यांनी म्हटले.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात झालेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान इमरान खान यांनी केलेले हे आरोप समोर आले आहेत. माजी क्रिकेटपटू खान यांनी खुलासा केला की शौकत खानम रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ असीम युसूफ यांनी बीबीच्या चाचण्या इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये करण्याची शिफारस केली होती. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला तुरुंग अधिकाऱ्यांनी न मानता आपल्या पत्नीची वैद्यकीय चाचणी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) रुग्णालयात चाचण्या घेण्याचा आग्रह धरला. (हेही वाचा, Imran Khan यांना Islamabad High Court चा दिलासा; Toshakhana case मधील शिक्षेला स्थगिती)

इमरान खान यांना कोठडीत असताना पत्रकार परिषद घेण्यास कोर्टाने मनाई केली आहे. याबाबतच्या युक्तीवाद करताना खान यांनी म्हटले की, आपल्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढून विपर्यास केला जातो आहे. त्यामुळे आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी प्रसारमाध्यमांशी आपला संवाद नियमीत होणे गरजेचे आहे. कोर्टाने आपणास प्रत्येक सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी किमान 10 मिनीटे संवाद साधण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही खान यांनी कोर्टाकडे केली. दरम्यान, कोर्ट यावर काय विचार करते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Illegal Marriage In Pakistan: बेकायदा विवाह प्रकरणात Imran Khan आणि Bushra Bibi यांना 7 वर्षांची शिक्षा )

इमरान खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपल्या पत्नीला 17 एप्रिल रोजी तुरुंगात टाकल्याचा आरोप केला. तसेच, पत्नीच्या जीविताचे काही बरेवाईट झाले तर त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. "माझ्या पत्नीला सुनावलेल्या शिक्षेत जनरल असीम मुनीरचा थेट सहभाग आहे," असे खान यांनी ठामपणे सांगितले आणि बीबीच्या खटल्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या न्यायाधीशांना निकाल देण्यास भाग पाडले गेले, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानमध्ये अलिकडेच सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांवेळी इमरान खान तुरुंगातच होते. मात्र, त्यांच्या सर्व समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यात ते मोठ्या संख्येने विजयीसुद्धा झाले. मात्र, अस असले तरी त्यांच्या समर्थकांना सत्ता मिळवता आली नाही.