Illegal Marriage In Pakistan: बेकायदा विवाह प्रकरणात Imran Khan आणि Bushra Bibi यांना 7 वर्षांची शिक्षा
Imran Khan | (Photo Credits: Facebook)

Imran Khan Aand Bushra Bibi Marriage News: न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा खान यांना त्यांच्या 2018 च्या विवाहासाठी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imran Khan in Jail) आणि दंड ठोठावला आहे. हा विवाह पाकिस्तानी कायद्यानुसार बेकायदेशीर (Illegal Marriage) मानला गेला आहे. पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2024 (Pakistan National Elections) पूर्वी इमरान खान यांच्याविरोधात आलेला हा तिसरा न्यायालयीन निर्णय आहे. हा निर्णय न्यायालयीन असला तरी त्याची वेळ पाहता त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. इमरान खान यांना पाकिस्तानी जनतेकडून मिळणारा पाठिंबा प्रचंड आहे. त्यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सभासदांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असे असताना खान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

इमरान खान यांच्यावरील आरोप

इमरान खान आणि बुशरा बीबी खान यांना बेकायदेशीर विवाह, देशाची गुपिते फोडणे करणे आणि सरकारी भेटवस्तूंची अनधिकृत विक्री, यासह अनेक आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. खान यांच्या प्रतिनिधींनी तिन्ही निकालांवर न्यायालयीन आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. सध्या, माजी पंतप्रधान इमरान खान रावळपिंडीमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या पत्नी सध्या इस्लामाबादमधील त्यांच्या निवासस्थानी आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. (हेही वाचा, Toshakhana Case मध्ये Imran Khan आणि त्यांची पत्नी Bushra ला 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा)

तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

तुरुंगवासाव्यतिरिक्त या दाम्पत्याला प्रत्येकी 500,000 रुपये किंवा अंदाजे $1,800 दंडाचा सामना करावा लागतो आहे. इम्रान खानच्या तुरुंगवासावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) ने एक विधान जारी केले आहे. ज्यामध्ये या कायदेशीर कार्यवाहीला "कायद्याची थट्टा" म्हटले आहे. या प्रकरणातील सुनावणी अत्यंत घाईघाईने करण्यात आली आहे. त्याला योग्य कायदेशीर आधार घेण्यात आला नसल्याचेही पीटीआय पार्टीने म्हटले आहे. (हेही वाचा, Imran Khan Granted Bail: इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सायफर प्रकरण)

विवाहावेळी इस्लामिक कायद्याचे उल्लंघन

पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी इम्रान खान यांनी जानेवारी 2018 मध्ये गोपनीयतेने आयोजित करण्यात आलेला विवाह इस्लामिक नियमांचे उल्लंघन करणारा आहे, असा ठपका या दाम्पत्यावर ठेवण्या आला आहे. खास करुन घटस्फोटानंतर 'इद्दत' प्रतीक्षा कालावधी. इस्लामिक परंपरा नंतरच्या विवाहांमध्ये पितृत्वाबाबत स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी इद्दतला हुकूम देते, यापैकी कोणत्याच पद्धतीचे पालन खान यांच्याकडून झाले नसल्याचे निकालात म्हटले आहे.

खानचे माध्यम सल्लागार झुल्फी बुखारी यांनी, कायदेशीर प्रक्रियेतील प्रक्रियात्मक अनियमिततेवर जोर देऊन, "बनावट प्रकरणे" म्हणून विवाहावरील आरोप फेटाळून लावले. बुशरा खानचे माजी पती खावर मनेका यांनी फौजदारी तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे माजी पंतप्रधानांभोवती कायदेशीर गुंतागुंत आणि खटल्याची व्याप्ती वाढत होती. अखेर या प्रकरणात खान यांना शिक्षा झाली.