Manasi Naik Divorce: अभिनेत्री मानसी नाईक ने पती Pardeep Kharera सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर मौन सोडत स्पष्ट केला कटू निर्णय!
Mansi Naik ( Photo- Instagram )

अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हीने तिच्या पतीसोबतचे सारे फोटोज सोशल मीडीया अकाऊंट वरून हटवल्यानंतर तिचं पती प्रदीप खरेरा सोबत काही बिनसलं आहे का? याची चर्चा सुरू झाली होती. आता अखेर या चर्चांवर मानसीने मौन सोडत आपण घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं आहे. मानसीने हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना आपल्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली आहे. अवघ्या दीड वर्षांच्या संसारानंतर मानसी आणि प्रदीप वेगळे होत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. मानसी-प्रदीपच्या रिल्सला त्यांचे चाहते पसंती देत होते.

मानसी नाईक मागील काही दिवसांपासून सोशल मीडीयामध्ये काही पोस्ट करत असल्याने त्याच्या आशयामधून प्रदीप-मानसीमध्ये काहीतरी बिघडल्याचं समोर येत होतं. सोशल मीडीयात मानसीने तिच्यानावासमोरून खरेरा हे आडनाव देखील हटवले आहे. लग्नाचे फोटोजही हटवले आहेत. नक्की वाचा:  Manasi Naik आणि पती Pradeep Kharera यांचा लग्नानंतरचा रोमान्स दर्शवणारे 'वाटेवरी मोगरा' गाणे प्रदर्शित, Watch Video.

'आमच्यात लग्नानंतर काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे ठीक होऊ शकल्या नाहीत. मागील काही काळात सारंच खूप वेगात घडत आहे. पण मला माझ्या प्रेमावर आजही विश्वास आहे. मला माझं कुटुंब हवं होत आणि मी तेव्हा लग्न केलं. ते ही फार घाईघाईत झालं. मला वाटतं तिथेच काहीतर चुकलं. पण आता या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आली आहे. पण त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला माझा स्वाभिमान आहे. स्वत:ची काही मतं आहेत आणि ती महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊया इतक्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे कळणं माझ्यासाठी गरजेचं होतं.' असं मानसी म्हणाली आहे.

प्रदीप हा बॉक्सर आणि मॉडेल आहे. मूळचा तो हरियाणा येथील आहे. लॉकडाऊन मध्ये त्यांनी गुपचूप साखरपूडा आणि नंतर लग्न केले होते. मराठी सिनेक्षेत्रातील काही मोजकेच कलाकार त्या लग्नाला उपस्थित होते.