Mahesh Manjrekar Health Update: महेश मंजरेकर यांच्यावर Urinary Bladder Cancer च्या निदानानंतर शस्त्रक्रिया, आता प्रकृतीत सुधार; रिपोर्ट्स
Mahesh Manjrekar (Photo Credits: Twitter)

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना युरिनरी ब्लॅडर कॅन्सरचं (Urinary Bladder Cancer) निदान झाल्याने त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईत शस्त्रक्रिया पार पडल्याचं वृत्त आहे. Etimes च्या वृत्तानुसार, चर्नी रोड येथील H N Reliance Foundation Hospital मध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान 63 वर्षीय महेश मांजरेकर आता आजारपणातून बाहेर पडत असून प्रकृती सुधारत असल्याचेही या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. SwatantraVeer Savarkar Poster: वीर सावरकर यांच्यावर येणार महेश मांजरेकर दिग्दर्शित नवा चरित्रपट; 138 व्या जयंती दिनाचं औचित्य साधत घोषणा.

महेश मांजरेकर यांचा 63 वा वाढदिवस नुकताच मुंबई मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळी सलमान खान सह इंडियन आयडॉलचे स्पर्धक देखील या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या बर्थ डे पार्टीचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayli Kamble (@saylikamble_music)

दरम्यान महेश मांजरेकर बिग बॉस 3 चं सूत्रसंचलन करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 3 ची घोषणा झाली आहे पण अद्याप तो कधी सुरू होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. या शो सोबतच महेश मांजरेकर 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक 'अंतिम' चं दिगदर्शन करत आहेत. सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा या सिनेमामध्ये झळकणार आहे.

महेश मांजरेकरांनी अनेक मराठी हिंदी सिनेमे केले आहेत. मराठी नाटकं केली आहेत. 1992 साली मराठी सिनेमा जीव सखा मधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.