Salman Khan Shoots for Antim: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) शनिवारी मुंबईत आपल्या ‘अंतिम’ चित्रपटाचे शूटिंग करताना दिसला. यावेळी सलमान खान ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे ट्राउजरमध्ये पाहायला मिळाला. शूटिंग दरम्यान त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात तो आपल्या बियर्डसह स्टायलिश अंदाजात चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. सलमान खानची भाची आयत शर्मादेखील ‘अंतिम’ या चित्रपटात दिसणार आहे.
अलीकडेचं मीडियामध्ये एक बातमी समोर आली होती की, सलमान या आठवड्यात आपल्या हिट टीव्ही रियलिटी शो 'बिग बॉस 14' साठी शूट करणार नाही. आपली वर्क कमिटमेंट्स पूर्ण केल्यामुळे सलमानला यावेळी शोला वेळ देता आला नाही. (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: नताशा दलाल कोण आहे? जिच्याशी वरुण धवन घेणार आहे सात फेरे)
सलमान खानला आपल्या 'अंतिम' चित्रपटाचे शूटिंग वेळेवर पूर्ण करायचे आहे आणि त्यामुळेचं तो चित्रपटाच्या शुटींगसाठी पुरेसा वेळ देत आहे. सलमान खानने नुकतचं आपल्या 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईद, 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने यासंदर्भात माहिती दिली आहे.