Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: नताशा दलाल कोण आहे? जिच्याशी वरुण धवन घेणार आहे सात फेरे
Varun Dhawan-Natasha Dalal (PC - Instagram)

Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) 24 जानेवारीला म्हणजेच आज विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी त्यांच्या बी-टाऊन ते फॅन्सपर्यंतच्या प्री-वेडिंग फंक्शन्सच्या बातमी बर्‍याच चर्चेत आहेत. वरुण धवनची होणारी पत्नी नताशा दलाल नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घेऊयात. नताशा दलाल ही मुंबईतील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एफआयटी) कडून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे. 2013 मध्ये ती भारतात परतली.

भारतात आल्यानंतर नताशाने स्वत: चे डिझाईन हाऊस सुरू केले. या फॅशन डिझाईन हाऊसचे नाव 'नताशा दलाल लेबल' असे आहे. त्याचे हे लेबल वधू आणि लग्नाच्या पोशाखांसाठी प्रसिद्ध आहे. वरुण आणि नताशाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे वर्गमित्रही होते. अलीकडेचं करीना कपूरच्या 'व्हाट वुमन वांट' या चॅट शोमध्ये वरुण नताशाबरोबरच्या नात्याबद्दल बोलला होता. (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या वेडिंग सेलिब्रेशनला आजपासून सुरुवात; पहा लग्नसोहळ्याच्या तयारीचे खास Photos)

त्यावेळी वरुणने सांगितले होते की, नताशाबरोबर त्याची पहिली भेट सहावीत असताना झाली होती. दोघेही बरेच वर्षे मित्र होते. नंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. वरुण आणि नताशाने बरेच दिवस आपलं नातं खासगी ठेवलं. कारण, नताशाला लाईमलाईटमध्ये येणं आवडत नाही. असे बरेच कमी प्रसंग आहेत, जेव्हा नताशा वरुणसोबत बाहेर दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Natasha Dalal (@i.natashadalal)

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी वरुणने इंस्टाग्रामवर नताशावर आपले प्रेम असल्याची कबुली दिली होती. त्याने नताशाबरोबर फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. वरुण धवन आणि नताशा दलाल 24 जानेवारीला अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. त्यांनी लग्नासाठी बुक केलेले ठिकाण खूपचं विलासी आणि महागडे आहे. रिपोर्ट्सनुसार, एका रात्रीच्या बुकिंगसाठी त्याची किंमत 4 लाख रुपये आहे.