
बॉलिवूड सुपरस्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 24 जानेवारी रोजी अलिबागच्या मेन्शन हॉटेलमध्ये यांचा शाही विवाहसोहळा पार पडेल. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण आणि नताशा यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे या आमंत्रितांच्या यादीत आहेत. अवघ्या दोन दिवसावर आलेल्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून वेन्यूचे काही खास फोटोज समोर आले आहेत.
अलिबागाच्या द मेन्शन हॉटेलमध्ये लग्नासमारंभाची जोरदार तयारी सुरु आहे. हॉटेलचा गार्डन एरिया पूर्णपणे झाकून घेतला जात आहे. बघ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, वरुण-नताशा यांचा विवाहसोहळ्याचा थाट यावरुनच लक्षात येतो. (Varun Dhawan and Natasha Dalal’s Wedding: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या शाही विवाह लग्नसोहळ्याचे ठिकाण इथपासून ते लग्नविधींसंदर्भात 'ही' आहे इत्यंभूत माहिती)
पहा फोटो:

अलिबाग मधील मेन्शन हॉटेल हे सर्वात मोठ्या हॉटेलपैकी एक आहे. यातील 25 रुम्स वरुण आणि नताशा यांच्या कुटुंबियांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. एग्जॉटिक पूल या हॉटेलच्या दिमाखात अधिकच भर घालतो.
दरम्यान, आजपासून वरुण-नताशा यांच्या वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. आज 22 जानेवारी रोजी मुंबईत चुन्नी सेरेमनी पार पडेल. यात दोन्ही कुटुंब सहभागी होतील. तर 24 जानेवारी रोजी विवाहसोहळा पार पडेल. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु, कोविड-19 संकटामुळे लग्नात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची संख्या सीमित करण्यात आली आहे. त्यामुळे वरुण-नताशा यांच्या लग्नाला कोण-कोण उपस्थित राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.