Varun Dhawan and Natasha Dalal’s Wedding: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या शाही विवाह लग्नसोहळ्याचे ठिकाण इथपासून ते लग्नविधींसंदर्भात 'ही' आहे इत्यंभूत माहिती
Varun Dhawan, Natasha Dalal (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊन 2020 मध्ये अनेक लग्न रखडली. त्यामुळे 2021 हे वर्षाच्या सुरुवातीसच मराठीसह बॉलिवूडमधील अनेक नामांकित स्टार्सचे लग्न होत आहे. त्यात आता सर्वांना उत्सुकता लागून राहिलेले आणि चर्चेत असलेले बॉलिवूडमधला शाही विवाह लग्न सोहळा लवकरच पार पडणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या 24 जानेवारीला अलिबागमध्ये या दोघांचा विवाह होणार आहे. या लग्नाला बॉलिवूडव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या शाही विवाहसोहळ्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. हे लग्न कुठे, कसे होणार ही सर्व माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वरुणच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे तुमची उत्सुकता थोडी आणखी वाढविण्यासाठी वरुणच्या लग्नसोहळ्याविषयी काही खास माहिती...

लग्नाचे ठिकाण (Wedding Venue)

Pinkvilla ने दिलेल्या रिपोर्टनुसार, वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे लग्न येत्या 24 जानेवारीला अलिबागच्या 'The Mansion House' मध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या होणा-या नवरा-नवरीसमोर अलिबागमधील 'Tropicana Resort and Spa' आणि 'The Mansion House' असे दोन पर्याय होते. त्यात वरुण आणि नताशाने द मॅन्शन हाऊस निवडले. तसेच पाहुण्यासाठी अलिबागमधील The Palm Court, The Cove Room आणि The Sky Deck Room असे तीन Villa बुक करण्यात आले आहेत. लग्नाला येणा-या पाहुण्यांची सोय तिथे करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे, सलमान खान-कैटरीना कैफसह 'हे' असतील लग्नात विशेष पाहुणे

पाहुण्यांची यादी (The Guest List)

Mid Day ने दिलेल्या वृत्तानुसार, COVID-19 चा धोका लक्षात घेता धवन कुटूबियांनी लग्नासाठी 50 पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. त्यात नृत्य दिग्दर्शिक रेमो डिसूजा, करण जौहर, सलमान खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी कुंद्रा, राज कुंद्रा, वासू भगनानी यांचा समावेश आहे.

लग्नाचा ड्रेस (Wedding Outfits)

वरुण आणि नताशा च्या लग्नातील आऊटफिट्स बाबत तशी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, वरुणचा ड्रेस डिझायनर अक्षय त्यागी किंचितशी हिंट देत या लग्नात नवरदेव कलरफुल स्टाईलमध्ये दिसेल. तसेच अन्य लग्नाप्रमाणे त्याच्या लग्नातील कपडे भगभगीत रंगाचे न ठेवचा डोळ्यांना सौम्य दिसतील असे आऊटफिट्स दिसतील. त्याचबरोबर वरुण यात कुणाल रावल याचे कलेशनमधील आऊटफिट घालू शकतो असेही सांगितले आहे. तर दुसरीकडे नताशा ही स्वत: फॅशन डिझायनर असल्यामुळे ती स्वत:चे आऊटफिट्स स्वत: डिझाईन करणार अशी माहिती मिळत आहे.

लग्नविधी (Shaadi Festivities)

रिपोर्टनुसार, वरुण आणि नताशा यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून आज त्यांची 'Chunni' सेरेमनी होणार आहे. यात धवन कुटूंबिय नताशासाठी खास दुपट्टा घेऊन तिच्या घरी जाणार आहेत. तर संगीत आणि मेहंदी सेरेमनी ही 22 आणि 23 जानेवारीला होणार आहे.

हे सर्व वाचून चाहते म्हणून आपल्या सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वच चाहते सोशल मिडियावर त्यांचे फोटोज अपलोड होण्याची वाट पाहत आहे.