Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे, सलमान खान-कैटरीना कैफसह 'हे' असतील लग्नात विशेष पाहुणे
Varun Dhawan and Natasha Dalal (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेले बॉलिवूडचे एक बिग फॅट वेडिंग (Big Fat Wedding) लवकरच होणार आहे. अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) लवकरच आपली गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) सह विवाहबंधनात अडकणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, येत्या 24 जानेवारीला अलिबाग येथे हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसेच वरुणचे वडिल दिग्दर्शक डेविड धवन (David Dhawan) हे बॉलिवूडचे खूप जुने आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असल्यामुळे वरुणच्या लग्नाला अनेक कलाकारांची मांदियाळी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 5 दिवस हा शाही विवाह सोहळा रंगणार असून याला सलमान खान, कैटरिना कैफसह अनेक दिग्गज कलाकार उपस्थिती लावणार आहे.

बॉलिवूड हंगामा ने दिलेल्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या विधी आणि कार्यक्रम हे 22 जानेवारीपासून सुरु होतील. ज्यात 24 जानेवारीला लग्न झाल्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. तसेच नताशा ही फॅशन डिजायनर असल्याने आपले लग्नाचे ड्रेस स्वत: डिझाईन करणार आहे. तर कुणाल रावल हा वरुण धवन चा ड्रेस डिझाईन करणार आहे.हेदेखील वाचा- Jacqueline Fernandez Hot Pics: जॅकलिन फर्नांडिस हिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by @_varun_obsessed

संगीत कार्यक्रमापासून या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. यात अर्जुन कपूर, सारा अली खान, मलायका अरोड़ा, शशांक खेतान, नीतू कपूर, कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर, खुशी, रिया कपूर, कैटरीना कैफ आणि मनीष मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटीज परफॉर्म करतील. त्यात सोनम कपूर यांची जवळची मैत्रिण आहे मात्र आपल्या कामाच्या व्यापामुळे ती या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही.

संगीतानंतर मेहंदी कार्यक्रम होईल. ज्यानंतर कॉकटेल नाइट ठेवण्यात येईल. यात 200 पाहुणे उपस्थित असतील ज्यांची आधीच यादी बनविण्यात आली आहे. त्यानंतर 24 जानेवारीला वरुण आणि नताशा यांचे सनई-चौघड्यांच्या सूरात लग्नबंधनात अडकतील.