Lok Sabha Elections 2019: निवडणूक प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर हिने लहान मुलांसाठी गायले गाणे (Watch Video)
Urmila Matondkar (Photo Credits: Twitter)

'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Umrila Matondkar) हिला काँग्रेस पक्षाकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

मुंबईतील बोरिवली परिसरात प्रचार करताना तिने चक्क लहान मुलांसाठी गाणे गायले. 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या तिच्या सिनेमातील 'लकडी की काठी, काठी पे घोडा' हे गाणे गात तिने लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे मन जिंकले. यावेळी उर्मिलाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.

AIPC- MUMBAI NORTH ट्विट:

काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान रिक्षाचालक बनल्याचा उर्मिलाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवताना उर्मिलाचा सामना भाजपाचे तगडे नेते गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे.