काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर (Umrila Matondkar) हिला उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर लगेचच उर्मिलाने प्रचाराची कामे हाती घेतली आहेत. अलिकडेच प्रचार करताना मुंबईतील विविध समूहांची तिने भेट घेतली. या प्रचारकार्याचे काही फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यातील रिक्षाचालक बनलेली उर्मिलाचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रचाराचे काही खास फोटोज उर्मिलाने स्वतः आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बॉलिवूडमध्ये सिनेमातील आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता उर्मिला राजकारणात आपले नशीब आजमावत आहे. निवडणूकीच्या रिंगणात उर्मिला अगदी उत्साहाने आणि उमेदीने उतरली आहे. मुलाखती, प्रचारकार्य यातून तिचा निवडणूकीचा उत्साह प्रतीत होतोच. पण तिचे हे फोटोजही याची साक्ष देत आहेत.
पहा फोटोज:
View this post on Instagram
Charkop party members and people..let’s march ahead. Jai Hind 🇮🇳 #AapliMumbaichiMulgi
गोपाळ शेट्टी यांची प्रचार मोहीम:
Glimpses of Prachar Rally organized at Malad from Evershine Nagar to Bhujale Talao with Corporator Smt. @JayaSSTiwana ji. Thank you everyone for showing such great support and making this event more graceful. #PhirEkBaarModiSarkaar pic.twitter.com/bRogmLMrv7
— Chowkidar Gopal Shetty (@iGopalShetty) April 1, 2019
उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवताना उर्मिलाला भाजपाचे तगडे नेते गोपाळ शेट्टी यांचा सामना करावा लागणार आहे. उर्मिलाने प्रचार कार्याला सुरु केली असली तरी दुसरीकडे गोपाळ शेट्टीही रॅली आणि सभांच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहचत आहेत.