KBC 11 मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या बबिता तांडे बनल्या निवडणूक आयोगाच्या ब्रँड एम्बेसडर
Babita Tade (photo Credits: @Vidarbha24news)

कौन बनेगा करोडपती या रिऍलिटी शो मधील एक कोटी जिंकणाऱ्या बबिता तांडे यांना आता निवडणूक आयोगाने एम्बेसडर पद दिलं आहे.

अमरावती जिल्याच्या रहिवासी असणाऱ्या बबिता आपल्या जिल्ह्याच्या SVEEP (सिस्टमेटिक वोटर्स एजुकेशन एंड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन) या कार्यक्रमांतर्गत एम्बेसडर म्हणून काम बघणार आहेत. अमरावती जिल्हातील घराघरात जाऊन मतदान हक्काचे महत्त्व त्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बबितांविषयी सांगायचं तर अमरावती जिल्ह्यातील अंजानगांव सुरजी येथील त्या ग्रामस्थ आहेत. कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभागी होण्याआधी त्या सरकारी शाळेत मुलांसाठी स्वयंपाक करण्याचं काम करायच्या. त्या शाळेत खिचडी बनवायचं काम करून महिन्याला 1500 हजार रुपये त्या कमवत असत.

एक छोट्याशा गावातून आलेल्या बबिता सप्टेंबर महिन्यात अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी झाल्या आणि एक कोटीचं बक्षीस जिंकल्या.