संपूर्ण भारतावर सध्या कोरोनाचे भयाण वादळ घोंगावत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशवासियांनी एकत्र येऊन या वादळाला परतवून लावायचे आहे. यासाठी कन्नड सुपरस्टार अर्जुन गौडा (Arjun Gowda) हा रुग्णवाहिका चालक बनला आहे. कन्नड सुपरस्टार अर्जुन गौड लोकांच्या मदतीला धावून आला आहे. तो कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालकाचे काम करत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत आहे.
बंगलोर टाईम्सने याबाबत बातमी दिली असून याबाबत अर्जुनला विचारले असता, 'गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेक करोना संक्रमित लोकांवर अंत्यसंस्कार केले. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना वेळेवर मदत मिळावी हिच माझी इच्छा आहे. तो व्यक्ती कुठून आला आहे, त्याचा धर्म कोणता या गोष्टीने काही फरक पडत नाही. गरज असणाऱ्या व्यक्तीची मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे.'
View this post on Instagram
'काही दिवसांपूर्वीच मी एक गरजू व्यक्तीला केन्गेरी येथून व्हाइटफील्ड रुग्णालायचा पोहोचवले. मी पुढचे काही महिने लोकांची मदत करणार आहे. कारण सध्याची परिस्थिती फार बिकट आहे.' असेही तो पुढे म्हणाला.
सध्या संपूर्ण भारत देश कोरोनाशी लढत असून या लढ्यात आता जॉनदेखील सहभागी झाला आहे. त्यासाठी तो आपल्या सोशल मिडियाचा वापर करणार आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण हाहाकार माजविला असून ऑक्सिजन, लस, औषधे आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक गोष्टींचा तुटवडा भासत आहे. यामुळे जॉनने अशा कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
जॉनने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. देशातील जनतेची ही समस्या पाहता, जॉन आपले सोशल अकाउंट्स सामाजिक संस्थांना सुपूर्त करणार आहेत. ज्यामुले गरजूंना सहायताकर्ताशी सरळ भेट होईल, ज्याची त्यांना फार मदत होईल.