सत्यमेव जयते, परमाणू यांसारख्या चित्रपटांतून देशभक्तीचे धडे देणारा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याने आपल्या ख-या आयुष्यात देशासाठी अनमोल योगदान देत मोलाचा संदेश देणार आहे. सध्या संपूर्ण भारत देश कोरोनाशी लढत असून या लढ्यात आता जॉनदेखील सहभागी होणार आहे. त्यासाठी तो आपल्या सोशल मिडियाचा वापर करणार आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण हाहाकार माजविला असून ऑक्सिजन, लस, औषधे आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक गोष्टींचा तुटवडा भासत आहे. यामुळे जॉनने अशा कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
जॉनने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. देशातील जनतेची ही समस्या पाहता, जॉन आपले सोशल अकाउंट्स सामाजिक संस्थांना सुपूर्त करणार आहेत. ज्यामुले गरजूंना सहायताकर्ताशी सरळ भेट होईल, ज्याची त्यांना फार मदत होईल.हेदेखील वाचा- Sonu Sood चे सरकारला खास अपील, कोरोनामुळे आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे
Anything & everything to save lives and win this battle TOGETHER#CovidIndiaInfo #CovidResources #CovidSOS #CovidHelp #Covid19IndiaHelp #COVID19 pic.twitter.com/mJhABuAeAy
— John Abraham (@TheJohnAbraham) April 30, 2021
जॉनने सांगितले की, तो जो कंटेंट आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करेल, ते मुख्य करुन कोरोनाशी लढणा-या रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मदतीच्या उद्देशाने असतील. ही वेळ आपल्या माणसांची मदत करण्याचा आणि मानवतेची साथ देण्याचा आहे. ज्यामुळे आपण या संकटातून बाहेर येण्यास मदत होईल. असे जॉनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, लवकरच तो आपल्याला 'अटॅक' आणि 'एक व्हिलन 2' मध्ये दिसेल.