![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/08/unnamed-2021-08-15T091715.910-380x214.jpg)
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day 2021) 'हम हिंदुस्तानी' (Hum Hindustani) हे गाणे शुक्रवारी (14 ऑगस्ट) संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आले आहे. धमाका रेकॉर्ड्सने आपला पहिला ट्रॅक 'हम हिंदुस्तानी' प्रदर्शित केला आहे, ज्यात सिनेमाचे 15 दिग्गज कलाकार आहेत. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, पद्मिनी कोल्हापुरे, अनिल अग्रवाल, सोनू निगम, कैलाश खेर, अलका याज्ञिक, शब्बीर कुमार, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुती हासन, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबैर यांनी गाण्याला आवाज दिला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षांपासून जग कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे या गाण्याच्या माध्यमातून दाखवले गेले आहे. तसेच हे गाणे या काळात अहोरात्र झटणाऱ्या फ्रन्टलाईन कामगारांचे कार्य दर्शवत आहे. एवढेच नव्हेतर, सर्व काही ठीक होईल, अशी आशा देखील दर्शवली जात आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 7 लाख वेळा पाहिला गेला आहे. हे देखील वाचा- Independence Day 2021 Patriotic Bollywood Songs List: स्वातंत्र्य दिनानिमित्त SRK च्या परेदस मधील 'आय लव्ह माय इंडिया' ते Alia च्या राजी सिनेमातील 'ए वतन' ही काही देशभक्तीपर गाणी पहा
व्हिडिओ-
धमाका रेकॉर्ड्सच्या सह-संस्थापिका अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “मला खूप आनंद होतो की पारस मेहता यांच्यासह माझा मुलगा प्रियांक कोल्हापुरे धमाका रेकॉर्डद्वारे संगीताचा वारसा पुढे नेत आहे, ज्याचा पहिला ट्रॅक सर्व फ्रंटलाईन योद्ध्यांना समर्पित आहे. ते पुढे म्हणाले की, सर्व दिग्गज आणि आजच्या पिढीतील सुपरस्टार पहिल्या ट्रॅकला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. आम्ही याबद्दल खूप उत्सुक आहोत.
धमाका रेकॉर्ड्स हे प्रियांक शर्मा आणि पारस मेहता दिग्दर्शित संगीत लेबल आहे. परंपरा पुढे नेताना प्रियांक म्हणाला, 'मला खात्री आहे की मी माझे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचा संगीताचा वारसा पुढे नेल्याबद्दल अभिमान बाळगणार आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन सारख्या महान सुपरस्टार आणि दिग्गजांचे समर्थन आणि प्रेम मिळाल्याने मी खरोखरच धन्य आहे. मला आशा आहे की, हा ट्रॅक जगभरातील सर्वांमध्ये प्रेरणा, प्रोत्साहन आणि एकता निर्माण करेल. वेदांत समूहाच्या अनिल अग्रवाल फाउंडेशनने या गाण्याला पाठिंबा दिला आहे. 'हम हिंदुस्तानी' धमाका रेकॉर्ड्सच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.