हॉलिवूड गायिका लेडी गागा हिने 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' संस्कृत श्लोक ट्वीट केल्याने युजर्स बुचकळ्यात, काय आहे नेमका अर्थ?
Hollywood Singer Lady Gaga (Photo Credits-Instagram)

हॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा (Lady Gaga) हिने रविवारी ट्वीटरवर एक ट्वीट केल्याने युजर्स बुचकळ्यात पडल्याचे दिसून आले. लेडी गागा हिने ट्वीटरवर एक संस्कृत श्लोक लिहित ट्वीट केल्याने भारतीय युजर्सला आनंद झाला पण अन्य देशातील युजर्सला त्याचा अर्थ कळलाच नाही. गागा हिने संस्कृत श्लोक 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' (Lokah Samastah Sukhino Bhavantu) लिहित ट्वीट केल्यानंतर लोक त्याचा अर्थ काय आणि त्यामागे असलेल्या खास मेसेज नेमका काय याचा शोध घेऊ लागले.

जर तुम्हाला या मंत्राचा अर्थ माहिती नाही नसल्यास तर जाणून घ्या. 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु', हा एक संस्कृत श्लोक असून त्याचा नेमका अर्थ असा आहे की, जगातील सर्व जागा, सर्व लोक आनंद आणि स्वतंत्र राहावेत. माझ्या आयुष्याचे विचार, शब्द आणि कार्य कोणत्याही प्रकारे व्यक्तीला आनंद आणि स्वतंत्रतेचे योगदान देऊ करते.(Grammy Awards 2019: प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर लेडी गागा 3 पुरस्काराने सन्मानित, 'हे' गाणे ठरले Song Of The Year)

>हा आहे संपूर्ण श्लोक

स्वस्तिप्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः ।

गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

लेडी गागा हिने संस्कृतमधील श्लोक ट्वीट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 50 हजार लोकांपेक्षा अधिक जणांनी तिचे ट्वीटला पसंदी दिली आहे. तर 11 हजारापेक्षा अधिक जणांनी तिचे ट्वीट रिट्वीट केले आहे. काही लोक लेडी गागा हिचे ट्वीट पाहून बुचकळ्यात पडलेत. तर काहीजणांनी तिच्या ट्वीटचे कौतुक केले आहे.

गागा बाबत बोलायचे झाल्यास ती प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेसह उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. नुकत्याच लास वेगस येथील एका कॉन्सर्टमध्ये लेडी गागा स्टेजवरुन खाली पडल्याची बातमी सर्वत्र पसरली होती.