Marilia Mendonca Passes Away: प्रसिद्ध ब्राझीली गायिका मारिलिया मेंडोंका यांचे विमान अपघातात निधन
Marilia Mendonca | (Photo Credit- Credit - Twitter)

ब्राझीलमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायीका मारिलिया मेंडोंका (Famous Brazilian Singer Marilia Mendonca) यांचे विमान अपघातात निधन (Marilia Mendonca Passes Away) झाले आहे. त्या अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. बीबीसीच्या हवाल्याने आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात मेंडोका (Marilia Mendonca) यांचे काका आणि विमानाती क्रू मेंबरमधील दोघांचा मृत्यू झाला. दक्षिण-पूर्व मिनस गेरैस येथील एका अत्यंत दूर्गम प्रदेशात हा अपघात घडला. विमान अपघाताची माहिती मिळताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सन 2019 मध्ये लॅटीन ग्रॅमी विजेता, मेंडोका या नाती तुटलेल्या महिलांच्या मदतीबाबत विशेष मोहीम हाती घेतल्याने प्रसिद्ध झाल्या होत्या. ब्राझीलच्या लोकसंगीतातील एक महत्त्वाचे आणि मोठे नाव मारिलिया मेंडोंका यानी पौंगंडावस्थेत असल्यापासूनच करिअर सुरु केले आणि 2016 मध्ये राष्ट्रीय स्टार बनल्या. त्यांना ब्राझीलमधील 'दु:खीतांची राणी' म्हणून ओळखले जाते. (हेही वाचा, US: म्युजिक फेस्टिव्हलमध्ये स्टेजच्या जवळ जाण्यासाठी प्रेक्षकांची एकमेकांना धक्काबुक्की, 8 जणांचा मृत्यू)

पाठीमागील वर्षी कोरोना व्हायरस महामारीत संगित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तेव्हा मारिलिया मेंडोंका यांनी ऑनलाईन गिग्स मध्ये सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम युट्यूबवर 3.3 मिलियन युजर्सनी पाहिला. जगातील सर्वात मोठे आणि पाहिले जाणारे लाईव्ह स्ट्रीमिंगचा विक्रम या कार्यक्रमाने बनवले. मारिलिया मेंडोंका या 2020 मध्ये स्पोटिफाईवर अधिक ऐकल्या जाणाऱ्या ब्राझीलमधील गायिका होत्या.

मेंडोका यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मारिलिया मेंडोंका यांच्या अपघाताची घटना 12 किमी दूर अंतरावर कॅरेटिंगा शहरात शुक्रवारी एका कार्यक्रमात जाण्यासाठी तयारी करत होत्या.